संगीत हा समाजातील विविध स्तरातील बांधवाना एकत्र गुंफून ठेवणारा एक धागा , बंध समजला जातो . ब्राह्मण युनिटी च्या सुरवातीच्या म्हणजे २०१७ पासून च्या वर्षापासून संगीताची आवड असणारे अनेक वयोगटातील ब्रह्मवृंद एकत्र आले . परिस्थितीनुरूप आपली संगीताची आवड जोपासू न शकलेल्या अनेकांना ब्राह्मण युनिटी चा सारेगम हा संगीत ग्रुप एक प्रकारची संजिवनी ठरला आहे . आज पर्यंत या ग्रुप चे शेकडो विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडले आहेत .
रक्तदान शिबीर हे दान अत्यंत पवित्र मानले जाते हे फाउंडेशन वेगवेगळ्या शहरांमध्ये, मेडिकल कॅम्पस घेऊन लोकांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देण्यास आणि काही तक्रारी असतील तर त्या बद्दल मार्गदर्शन करणे , त्याच बरोबर रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करणे, मेडिकल टेस्टिंग आणि रक्तदान शिबिरे आयोजित करणे, इच्छुक रक्तदात्यांचा डेटा गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना आणि शिक्षकांना आधुनिक ई-लर्निंग प्रणाली पुरवून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आधुनिक ई लर्निंग टेक्नॉलॉजी पुरवून , SSC या अभ्यासक्रमातुन करियर विषयक मार्गदर्शन , यातील पहिला प्रोजेक्ट नांदेड मधील शिक्षकांसोबत करण्यात आला आहे .
कोणत्याही परिस्थितीत आपल्या अजोड कौशल्याने, बुद्धिमत्तेने, आणि नैसर्गिक शक्तिच्या सामर्थ्यावर जीवन घडवण्याची क्षमता भारतीय स्त्री मध्ये असते . पुराणकाळापासून स्त्री ला अनेक रूपात आपण पाहात आणि अनुभवत आलो आहोत . समाजातील या दुर्गा , सरस्वती आणि लक्ष्म्या एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे अतुलनीय कार्य करतात.
समाजाची भावी पिढी सक्षम होण्यासाठी त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे , त्यांच्या क्रियाशील कौशल्यांना एकत्र आणून व्यासपीठ उपलब्ध करून देणे आपला व्यवसाय समृद्ध व्हावा आणि तो पुढे जाऊन वारसा हक्काने सर्वदूर पोहोचावा आणि समृद्ध व्हावा हे स्वप्न अशा प्रकारच्या व्यावसायिक उपक्रमांमुळे पूर्ण होऊ शकते.
व्यवसाय करणे हि ब्राह्मण समाजाची आता प्राथमिक आणि काळाची गरज आहे. बुद्धिमत्ता आणि कष्टाची तयारी याला व्यवहार ज्ञानाची उत्तम साथ मिळाली तर ब्राह्मण समाज व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात भरीव प्रगती करू शकतो. युनिटी बिझनेस कल्चर (UBC ) च्या माध्यमातून ब्राह्मण व्यावसायिकांना संघटित करणे , त्यांना आवश्यक असे तंत्रज्ञान , सल्ला व अर्थसहाय्य यांची देवाणघेवाण करून त्यांच्या व्यवसायाला योग्य ती बाजारपेठ मिळवून देणे यासाठी UBC कटिबद्ध आहे अनेक छोटया व मध्यम स्वरूपी व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या कक्षा विस्तारण्याच्या संधी आणि योग्य अशी बाजारपेठ मिळते ती UBC च्या प्रदर्शनांच्या मालिकांमधून . ब्राह्मण फर्स्ट या उक्तीला अनुसरून आपला समाजही या व्यावसायिकांच्या उपक्रमांना मनोमन हातभार लावत असतो. आपला व्यवसाय समृद्ध व्हावा आणि तो पुढे जाऊन वारसा हक्काने सर्वदूर पोहोचावा आणि समृद्ध व्हावा हे स्वप्न UBC च्या अशा प्रकारच्या व्यावसायिक उपक्रमांमुळे पूर्ण होऊ शकते.
आपल्या उत्पन्नाचे योग्य आणि सुरक्षित पद्धतीने आर्थिक नियोजन करण्याच्या उद्देशाने, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, विमा, मेडिक्लेम व्यवसाय यातील पात्र सल्लागारांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण विविध पद्धतीने केले जाते आणि त्यासाठी ऑनलाइन वर्ग आणि शिबिरे आयोजित केली जातात.
समाजातील गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिस्थितीत असलेल्या विद्यार्थी व विद्याथिनिंना आर्थिक शैक्षणिक सहाय्य सरस्वती फंडामधून करण्यात येते , या योजनेतील लाभार्थी कुटुंबांनी भविष्यात सामाजिक जाणीव आणि बांधिलकी ठेवून अशीच मदत आपल्या समाज बांधवांना करण्यासाठी प्रेरित करावे
वेगवेगळी कौशल्ये असणारी व्यावसायिक मंडळी एकत्र आणून एकमेकांच्यात सेवा विस्तार आणि पुरवठा करणे, तांत्रिक मार्गदर्शन पुरवणे आणि भविष्यात ब्राह्मण समाजासाठी योग्य व रास्त दरात भव्य प्रकल्प उभे करणे हे या ग्रुप चे उद्दिष्ट आहे A group of technical service experts वेगवेगळी कौशल्ये असणारी व्यावसायिक मंडळी एकत्र आणून एकमेकांच्यात सेवा विस्तार आणि पुरवठा करणे, तांत्रिक मार्गदर्शन पुरवणे आणि भविष्यात ब्राह्मण समाजासाठी योग्य व रास्त दरात भव्य प्रकल्प उभे करणे हे या ग्रुप चे उद्दिष्ट आहे
खेळ , संगीत , ट्रेकिंग , सहली या माध्यमातून मिळणारी ऊर्जा समाजात चैतन्य निर्माण करते . विविध खेळांच्या स्पर्धा , ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी भटकंती , सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सहभाग यामुळे अनेक परिवार एकत्र आले आणि ब्राह्मण युनिटी च्या मूळ उद्देशाला हातभार लावला .
नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी अन्नधान्य, उपयुक्त संसारोपयोगी वस्तू आणि आर्थिक सहाय्य केले जाते. कोविड काळात 39 पोलीस ठाणे, निवासी शाळा, आश्रमशाळा, अग्निशमन दलात सॅनिटायझर आणि हँड्स फ्री ss 304 ग्रेड स्टँड बसवण्यात आले आहेत.
रोजच्या परस्परसंवादांसाठी ट्रॅव्हल / सेकंड सेल / गार्डन , पुस्तक वाचन , स्पोर्ट्स , पाळीव प्राणी शिक्षण माहिती , आंतरराष्ट्रीय समूह आणि २४ तास चालणाऱ्या गप्पांसाठी रेशीमबंध या सारखे वेगवेगळ्या शहरांमध्ये उपयुक्त समूह ही तर आपली खासियतच